कार आणि डंपरची समोरासमोर धडक, पाच मित्रांचा जागीच मृत्यू

कार आणि डंपरची समोरासमोर धडक, पाच मित्रांचा जागीच मृत्यू

कार आणि डंपरची समोरासमोर धडक झाल्याने यात पाच मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमधील उदयपूरमध्ये घडली. मयतांममध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या मुलाचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सर्व मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात पाठवले. तसेच डंपर ताब्यात घेतला आहे.

पाच मित्र कारने गुरूवारी मध्यरात्री अंबेरीहून देबारीला जात होते. यावेळी अंबेरी देबारी बायपास मार्गावर राँग साईडने गाडी चालवत असताना समोरून येणाऱ्या डंपरसोबत त्यांच्या कारची धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. यात पाच मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

हिम्मत खटीक, पंकज नंगारची, गोपाळ नंगारची, गौरव जीनगर अशी मयतांची नावे असून पाचव्या तरुणाचे नाव अद्याप कळू शकले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;