विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा चिरला

विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा चिरला

वार्षिक समारंभावरून झालेल्या वादातून शाळेतील एकाने नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची धक्कादायक घटना मांजरीतील शाळेत घडली. याप्रकरणी 14 वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यात 15 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शाळेत तक्रारदाराचा मुलगा नववीत शिकायला आहे. आरोपी मुलगा त्याच्या वर्गात शिकायला असून, शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात येणार होते. वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून दोघांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी (19 नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास पीडित मुलगा वर्गात बसला होता. त्यावेळी वर्गातील आरोपी मुलाने त्याच्यावर काचेच्या तुकड्याने वार केला. या घटनेत तो जखमी झाल्यामुळे वर्गात मुले घाबरली. आरोपीने पुन्हा त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.

जखमी झालेल्या मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलाला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक दादासाहेब रोकडे तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;