रील बनवण्यासाठी प्रँक करणे पडले महागात

रील बनवण्यासाठी प्रँक करणे पडले महागात

सध्या रीलसाठी वाट्टेल ते लोक करत आहेत. एका प्रवाशाला फ्लाईटसाठी उशीर झाल्याने त्याने चक्क विमानतळावर खोटे बोलत व्हिडीओ काढला. पत्नी गरोदर आहे, मला त्या ठिकाणी पोहोचणे खूप महत्त्वाचे आहे, असे खोटे सांगत विमानतळावरील एअरलाइन्स कर्मचारी आणि इतर प्रवाशांना आपल्या बाजूने केले. त्याच्या बायकोची प्रसूती आहे, त्याला जाऊ द्या, असे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रवाशांना सांगत विमान कर्मचाऱयांसोबत हुज्जत घातली. परंतु, नंतर हा प्रँक होता. माझी बायको गरोदर नाही, असा खुलासा त्या प्रवाशाने केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. रीलसाठी वाट्टेल ते करण्याची सवय लोकांची कधी जाणार आहे? असेही युजर्सनी म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;