ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, अभिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा सोडलं मौन

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, अभिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा सोडलं मौन

Aishwarya Rai – Abhishek Bachchan: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी ऐश्वर्या – अभिषेक एकत्र दिसत असल्यामुळे देखील दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना महानायक अमिताभ बच्चन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी माझ्या कुटुंबाबद्दल फार काही बोलत नाही आणि मला आवडत देखील नाही… असं वक्तव्य अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

नुकताच अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून नक्की सत्य काय आहे सांगितलं आहे. बिग बी म्हणाले, ‘वेगळं वागण्यासाठी आणि जीवनात वेगळेपणाच्या सत्यांवर विश्वास ठेवण्यासाठी धैर्य आणि प्रामाणिकपणा लागतो… कुटुंबाबद्दल मी फार काही बोलत नाही. कारण ते माझं क्षेत्र आहे आणि त्याची गोपनीयता राखणं माझं कर्तव्य आहे… तर्क केवळ तर्कच असतात…’ असं देखील बिग बी म्हणाले.

‘तर्क हे कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता फक्त अंदाज बांधून केलेले तर्क असतात… अफवा फक्त खोट्या असतात. त्यामध्ये काहीच तथ्य नसतं… त्याची पडताळणी व्हायला हवी… त्यांच्या आवडीचा व्यवसाय करण्याच्या त्यांच्या निर्णयावर मी शंका घेऊ नये. त्यांच्या समाजातील योगदानाचं मी कौतुक केलं पाहिजे… पण खोटं आणि प्रश्नचिन्ह त्यांची कायद्याच्या कचाटयातून रक्षा करु शकेल… पण प्रश्नचिन्ह उपस्थित करून संशयाचे बीज पेरले गेलं आहे.

पुढे बिग बी म्हणाले, ‘तुम्हाला जे आवडत आहे ते तुम्ही लिहिता… पण त्यापुढे प्रश्नचिन्हाचा वापर करता…, त्यामुळे तुम्ही केवळ अहवाल शंकास्पद आहे हेच दाखवत नाही, तर वाचकांनीही त्यावर विश्वास ठेवावा अशी तुमची इच्छा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होत राहील.’

असत्य किंवा असत्यावर प्रश्न उपस्थित करून तुम्ही तुमचं काम करता. पण त्याचा एखाद्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर कसा परिणाम होऊ शकतो…’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले. सध्या अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.

ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये ऐश्वर्याने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;