तर जनता भाजपला जोड्याने मारतील, विजय विजय वड्डेटीवार यांचे विधान
महाविकास आघाडीला 165-170 जागा मिळतील असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना केंद्र सरकारने किंवा केंद्रीय यंत्रणांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर जनता भाजपला जोड्याने मारतील असेही वडेट्टीवार म्हणाले.
एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, ग्राऊंड रिअॅलिटी काय आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीला 165-170 जागांवर विजय मिळणार. लोकांमध्ये महायुतीस सरकारविरोधात रोष आहे, हे सरकार घालवण्याचे जनतेने ठरवले होते. महायुतीने महाराष्ट्राची अब्रू घालवली. जनतेच्या मनात सत्तेतल्या लोकांबद्दल किळस निर्माण झाली होती. महायुतीला जिंकण्याचा एवढा आत्मविश्वास होता तर पैसे वाटण्याची वेळ का आली असती? पाच कोटी रुपये सापडले, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, या प्रकरणाचा आम्ही भंडाफोड करू असे वडेट्टीवार म्हणाले.
तसेच महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतरही केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांनी हस्तक्षेप केला तर जनता रस्त्यावर उतरेल, जनता भाजपला जोड्याने मारेल असे वडेट्टीवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List