ग्रँट रोड येथे इमारतीला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

ग्रँट रोड येथे इमारतीला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

ग्रॅण्ट रोड येथील बळीराम मार्गावरील जॉयती या 40 मजली इमारतीच्या 36 व्या मजल्यावर दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धुरामुळे रहिवाशांचा काही वेळ त्रास झाला. तसेच अचानक लागलेल्या आगीमुळे रहिवाशांमध्ये घबराटही उडाली.

ग्रॅण्ट रोड येथील बळीराम मार्गावरील जॉयती ही 40 मजली टोलेजंगी इमारतीत 36 क्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये 3.44 वाजता आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी  तेथे तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले. पाण्याचा मारा करीत दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. 4.45 वाजता आग पूर्णतः विझल्याचे जाहीर करण्यात आले. या आगीचा धूर इमारतीत वरच्या मजल्यांपर्यंत पसरला होता. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट उडाली होती. मात्र केळेत आगीकर नियंत्रण आल्याने मोठा धोका टळला. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून अधिक तपास अग्निशमन दलाकडून सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;