ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांवर अमिताभ यांनी सोडलं मौन, म्हणाले…

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांवर अमिताभ यांनी सोडलं मौन, म्हणाले…

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत आहेत. आतापर्यंत या बातमीवर बच्चन कुटुंबाकडून थेट काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र आता अमिताभ बच्चन यांनी या अफवांवर आपलं मौन सोडलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ”मी कुटुंबाबद्दल फार कमी बोलतो, कारण हे माझे डोमेन आहे आणि मी माझी गोपनीयता राखतो. अफवा फक्त अफवा आहेत. या खोट्या अफवा आहेत, ज्यांची पुष्टी झालेली नाही”

अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे की, ”काय लिहीले जात आहे, किंवा ते कसे रिपोर्ट केले जात आहे, याची आधी खात्री करणे आवश्यक आहे. लोक प्रमाणीकरणाची मागणी करतात, जेणेकरून त्यांना या व्यवसायावर विश्वास ठेवता येईल.”

अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, ‘तुम्ही तुम्हाला जे आवडते ते लिहता. परंतु जेव्हा तुम्ही त्यात प्रश्नचिन्ह (?) वापरता, तेव्हा तुम्ही हे सांगत नाही की, हे वृत्त शंकास्पद असू शकते. मात्र तुम्हाला असं वाटत की, वाचकांनी त्यावर विश्वास ठेवावा आणि ते पुढे शेअर करावं, जेणेकरून तुमच्या लेखनाला महत्त्व प्राप्त होईल.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;