पहिल्यादाच मतदान करण्यासाठी तरुणीने थेट लंडनहून गाठली रत्नागिरी
लंडनहून येऊन एका तरुणीने रत्नागिरीत मतदान केले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील देसाई हायस्कूल येथील मतदान केंद्रात तीने मतदानाचा हक्क बजावला. सानिका परशुराम निवेंडकर असे त्या तरुणीचे नाव असून तिने हे तिचे पहिले मतदान होते.
सानिका निवेंडकर शिक्षणासाठी सध्या लंडन येथील ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. बुधवारी पहिल्यांदाच तिने मतदान केले. गुरुवारी ती पुन्हा लंडनसाठी रवाना होणार आहे.
तिचे वडील रत्नागिरी जिल्हा परिषदेत सेवेत असून आई मुंबईत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत आहे. सानिकाने बुधवारी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List