“मी सिंगल नाही”; रश्मिका मंदानासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर विजय देवरकोंडाचे उत्तर

“मी सिंगल नाही”; रश्मिका मंदानासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर विजय देवरकोंडाचे उत्तर

साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आपल्या ‘साहिबा’ या म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनसाठी मुंबईत आहे. या निमित्ताने तो वेगवेगळ्या माध्यमांवर मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीदरम्यान त्याला त्याच्या आणि रश्मिका मंदाना यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं त्यावर त्याने अगदीच स्पष्ट उत्तर दिलं आहे.

“अनकंडिशनल प्रेम काय असतं माहित नाही पण….”

‘कर्ली टेल्स’ या यूट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत विजयला प्रेमाबद्दल विचारण्यात आलं. यावेळी त्याने प्रेम, नातेसंबंध आणि लग्न यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. विजयला अनकंडिशनल प्रेमाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्याने उत्तर दिलं की, “प्रेम करणं काय असतं हे मला माहीत आहे, पण अनकंडिशनल प्रेम असतं का हे मला ठाऊक नाही. कारण माझं प्रेम नेहमीच काही अपेक्षांसह असतं. मला असं कोणतं प्रेम माहीत नाही ज्यात अजिबात अपेक्षा नसतात. कदाचित असं प्रेम असू शकतं, पण मला त्याचा अनुभव नाही. शेवटी प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं की, प्रेमात थोड्या अपेक्षा असणं योग्यच आहे.”

सिंगल नसल्याची विजयची कबुली

त्यानंतर या मुलाखती दरम्यान विजयसोबत एक खेळही खेळण्यात आला. या खेळादरम्यान विजयने तो त्याच्या एका सहकलाकाराला डेट केरत असल्याची कबुली दिली. त्याने म्हटलं, “हो, मी माझ्या सहकलाकाराला डेट करत आहे. मी आता 35 वर्षांचा आहे. तुम्हाला वाटतं का की मी अजूनही सिंगल असेन? प्रत्येकालाच कधीतरी लग्न करावं लागतं. अर्थात, ज्याने हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला असतो त्याला हे लागू होत नाही.” असं म्हणत त्याने तो सिंगल नसल्याचे कबूल केले.

विजयचे अनेक मुलींसोबत नावे जोडली गेली. विजयचे एका बेल्जियन मुलीबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुरुवातीला हे फोटो मॉर्फ केलेले वाटले, परंतु नंतर तिच्या सोशल मीडियावर विजय आणि त्या मुलीच्या कुटुंबाबरोबरचे काही फोटो सापडले, त्यामुळे दोघे डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यावर विजयने काहीच कमेंट किंवा त्याचं मत मांडलं नव्हतं.

 

दरम्यान आता विजयचे नाव रश्मिका मंदानासोबतही जोडलं जातं आहे. विजय आणि रश्मिका मंदाना यांच्या डेटिंगच्या बातम्याही पसरल्या. रश्मिकाने अनेक वेळा विजयच्या घरी काढलेले फोटो पोस्ट केले आहेत, त्यामुळे चाहत्यांना अनेकदा वाटते की, ते एकमेकांना डेट करत आहेत.

विजयचे रश्मिकासोबतच्या नात्यावर अद्यापतरी भाष्य नाही 

मात्र, विजयने याबाबत कधीही भाष्य केले नाही. पण अॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका शोमध्ये रणबीर कपूरने रश्मिकाला विजयला कॉल करून तो स्पिकरवर ठेवण्यास सांगितला होता तेव्हा विजयने रश्मिकाला ज्या पद्धतीने हाय म्हटलं ते एकून रणबीरसह सर्वच गालातल्या गालात हसू लागले.

य़ा प्रसंगानंतर तर विजय आणि रश्मिकाच्या नात्याबद्दलच्या चर्चांना जास्तच उधाण आलं आहे. पण अद्यापपर्यंत रश्मिका किंवा विजय दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण विजय सध्या सिंगल नसल्याचे त्याच्या सांगण्यावरून स्पष्ट झाले आहे.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;