वादाची ठिणगी, निक्कीची आर्यावर ‘एक मोटा हाथी’ कमेंट; आर्याची थेट धमकीच, म्हणाली “उगाच भिडू नको…”

वादाची ठिणगी, निक्कीची आर्यावर ‘एक मोटा हाथी’ कमेंट; आर्याची थेट धमकीच, म्हणाली “उगाच भिडू नको…”

‘बिग बॉस मराठी 5’ च्या घरात सर्वात जर चर्चा झाली असेल तर ती आऱ्या आणि निक्कीच्या वादाची अन् आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याची. त्यानंतर अनेक प्रेक्षकांनी आर्याला पाठिंबाही दर्शवला होता. या प्रसंगानंतर आर्याला घरातून निरोप घ्यावा लागला होता. त्यानंतर हे पुन्हा याबाबत चर्चा झाली नाही. आर्या आणि निक्कीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.

‘बिग बॉस’ संपल्यानंतर पुन्हा एकदा निक्की आणि आर्यामधला वाद हा पेटताना दिसतोय. तोही एका व्हिडीओवरून आणि निक्कीने केलेल्या कमेंटमधून. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर आर्याने ‘बिग बॉस’च्या प्रवासावर एक रॅप लिहून आपलं मत मांडलं होतं. आर्याने शेअर केलेल्या रॅपवर “ही फुटेज खातेय” असा आरोप निक्कीच्या एका फॅनपेजने केला होता. हीच इन्स्टाग्राम स्टोरी निक्कीने रिशेअर करत त्यावर “एक मोटा हाथी…” हे गाणं लावलं. त्यामुळे हा वाद आता पुन्हा पेटला आहे.

निक्कीने केलेल्या या व्हिडीओवर आर्यानेही तिचा एक व्हिडीओ शेअर करत प्रतिउत्तर दिलं आहे. आर्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, “मला इन्स्टाग्रामवर एका मुलीचा मेसेज आला. त्यात असं लिहिलं होतं की, निक्कीची स्टोरी बघ. मी पाहिलं तेव्ह निक्कीने कोणाची तरी स्टोरी रिपोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की, आर्या अजूनही निक्कीच्या नावाने फुटेज खातेय. निक्की मॅडमने त्या पोस्टला “एक मोटा हाथी…” असं गाणं लावलं होतं. तू चांगलं फॅट शेमिंग करतेस निक्की… पण, प्लीज…मी पण एक रॅपर आहे. माझ्या लिखाणातून मी उत्तर देणार. तुम्हाला वाटतं ना मी गप्प राहावं मग मला उगाच भिडू नका. रॅप लिहिणं हे माझं काम आहे त्यामुळे मला जे वाटतं ते मी नक्कीच लिहिणार आणि त्यातून उत्तर देणार.”

 

aarya jadhao slams nikki tamboli for body shaming comment

आर्या पुढे म्हणाली “जर मला तुझ्या नावाने फुटेज हवं असतं… तर, मी घरात राहून जिंकून आले असते. तुला मारून घराच्या बाहेर नसते आले. तरीही आज लोक मला चांगलं बोलत आहेत. सगळे म्हणत होते अजून 4-5 पाच कानाखाली  का नाही मारल्यास… त्यामुळे प्लीज Get Over Yourself… आली मोठी मला भिडायला. मुलाखतींमध्ये ही मुलगी माझ्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी घाबरत होती. तिच मुलगी आता माझ्याबद्दल स्टोरीज टाकून फुटेज घेतेय…घे दिलं मी तुला फुटेज” असं रोखठोक मत आर्याने या स्टोरीजमधून मांडलं आहे.

असं म्हणत आर्याने निक्कीला थेट ताकीद दिल्याचे दिसून येत आहे. आता आर्याच्या या व्हिडीओवर निक्की काय उत्तर देणार आणि हा वाद शांत होणार की वाढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;