Kolhapur News : धक्कादायक! शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Kolhapur News : धक्कादायक! शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

कोल्हापूरमधील केर्ले येथील कन्या कुमार विद्यामंदिर शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडून जखमी झालेल्या सहावीतील स्वरूप दिपकराज माने (13,रा. केर्लेपैकी मानेवाडी, ता.करवीर) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना समोर आली आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून, करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी शाळेतील परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात गेले होते. शिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर लघूशंकेसाठी शिक्षकांना सांगून स्वरूप वर्गाबाहेर गेला होता. शाळेतील गेटच्या दरवाजातून जात असताना, नादुरूस्त असलेले लोखंडी गेट अचानक स्वरूपच्या अंगावर पडल्याने, त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. रक्तस्त्रावामुळे बेशुध्द अवस्थेत त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;