ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

लग्नाचे आश्वासन पूर्ण न केल्याने बलात्काराच्या आरोपात अडकलेल्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अशा प्रकरणांबाबत भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहेत की, ”सहमतीने नातेसंबंधात राहणाऱ्या जोडप्यांमध्ये ब्रेकअप झाल्यामुळे एखाद्या पुरुषाविरुद्ध फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही.”

का महिलेने आपल्याला लग्नाचे आश्वासन देऊन ते पूर्ण न केल्याने 2019 मध्ये प्रियकराविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे.

न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. बार अ‍ॅंण्ड बेंच या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने म्हटले हे की, ब्रेकअपमुळे सहमतीने नातेसंबंधात राहणाऱ्या जोडप्यांमध्ये फौजदारी कारवाई केली जाऊ शकत नाही. जेव्हा नातेसंबंध विवाहपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात दोन्ही पक्षांमधील सहमतीने असलेल्या संबंधांना गुन्हेगारी रंग दिला जाऊ शकत नाही.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, संबंधित महिलेने 2019 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. महिलेने फिर्यादीत म्हटले होते की, आरोपीने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची आणि तसे न केल्यास तिच्या कुटुंबियांना नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली होती. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या विरोधात आरोपीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली होती. जी न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यावर न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. तसेच दोन्ही पक्षकार आता विवाहित असून न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;