शिक्षकी पेशाला काळीमा, विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा

शिक्षकी पेशाला काळीमा, विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना अमेरिकेत उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी मेरीलँड येथील एका माजी शिक्षिकेला न्यायालयाने 30 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मेलिसा कर्टिस असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. मेलिसावर अल्पवयीन विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाचा आरोप होता.

फॉक्स 5 डीसी अहवालानुसार, लैंगिक शोषण प्रकरणातील तीन गुन्ह्यांसाठी मेलिसा कर्टिसला 30 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. याशिवाय 12 महिन्यांची शिक्षा निलंबित केली जाईल आणि पाच वर्षांची नजरकैदेची शिक्षा होईल.

तुरंगातून सुटका झाल्यानंतर, कर्टिसला 25 वर्षांसाठी लैंगिक गुन्हेगार म्हणून नोंदणी करावी लागेल. तसेच स्वतःच्या मुलांशिवाय इतर कोणत्याही अल्पवयीन मुलांसोबत मेलिसाला संपर्क ठेवण्याची परवानगी मिळणार नाही. आरोपी शिक्षिकेने 7 नोव्हेंबर 2023 रोजी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते.

कर्टिसने आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दारू दिली आणि त्याच्यासोबत कधी कारमध्ये तर कधी मॉन्टगोमेरी काउंटीमधील वेगवेगळ्या घरांमध्ये 20 पेक्षा जास्त वेळा सेक्स केला. कर्टिस सुमारे दोन वर्षे शिक्षिका म्हणून लेकलँड्स पार्क मिडल स्कूलमध्ये काम करत होती. शाळेनंतरच्या कार्यक्रमात ते एकटे असताना शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;