विमानात 23 वर्षीय मुलाने महिलेसमोर केले असे कृत्य, पोलिसांनी केली अटक

विमानात 23 वर्षीय मुलाने महिलेसमोर केले असे कृत्य, पोलिसांनी केली अटक

दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने विमानातील सहप्रवाशाने लैंगीक छळ केल्याच्या आरोपावरुन 23 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. एफआयआरनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1.20 दरम्यान एअर इंडियाच्या विमानात घडली आहे.

नवी दिल्लीच्या जनकपुरी येथे राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विमानात तिच्या बाजुला बसलेल्या सहप्रवाशाने आक्षेपार्ह वर्तन केले. महिलेच्या तक्रारीनुसार, त्या व्यक्तीने चादर ओढून आक्षेपार्ह वर्तन केले. मंगळवारी दक्षिण गोव्याकडील डबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी आरोपी विरोधात भादवी कलम 75, 79 अंतर्गच गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;