Adani bribery charge – सारवासारव करत लाचखोरीच्या प्रकरणावर अदानी समूहाची पहिली प्रतिक्रिया

Adani bribery charge – सारवासारव करत लाचखोरीच्या प्रकरणावर अदानी समूहाची पहिली प्रतिक्रिया

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाच आणि फसवणुकीचा आरोप लगावण्यात आले आहेत. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स 20 टक्क्यांहून अधिक कोसळले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरलेली असताना आता अदानी समूहाने सारवासारव करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमीशनद्वारा अदानी ग्रीनच्या संचालकांविरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने स्वतः म्हटल्याप्रमाणे, अभियोगातील आरोप हे केवळ आरोप आहेत. जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिवादी निर्दोष मानले जातात. आम्ही यावर सर्व ते कायदेशीर उपाय करत आहोत’, असे स्पष्टीकरण अदानी समूहाने पत्रक जारी करत दिले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;