‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत अखेर नको तेच घडलं; आकाशसमोर आलं सत्य
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका एक मनोरंजक वळण घेत आहे. विशाखाला कळतं की लकी हाच शार्दुल आहे आणि बनी त्याचा मुलगा आहे.
ती डीएनए चाचणीद्वारे हे कन्फर्म करते आणि बनी हा खरोखरच लकीचा मुलगा असल्याचं सिद्ध करते. त्या बदल्यात ती आकाशकडे पैशांची मागणी करते.
या सगळ्यात बनीचं अपहरण झालंय. अपहरणाच्या तपासाची जबाबदारी वसू घेते. बनी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबाला धक्का बसलाय आणि वसू लकीवर अपहरण घडवून आणल्याचा जाहीर आरोप करते.
एका भावनिक क्षणात, वसू लकीसोबतचं तिचं खरं नातं उघड करते. विशाखा आकाशला बनीसोबत एक व्हिडिओ कॉल दाखवते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List