मल्याळम अभिनेते मेघनाथन यांचे फुफ्फुसाच्या आजारामुळे निधन
मल्याळम इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते मेघनाथन यांचे वयाच्या 60 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मेघनाथन हे फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी सुस्मिता आणि मुलगी पार्वती असा परिवार आहे.
मेघनाथन हे अभिनेते बालन के. नायर यांचे पुत्र होते. मेघनाथन हे मल्याळम चित्रपट क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. मेघनाथन यांनी पाच दशकांहून अधिक काळ मल्याळम सिनेसृष्टीत काम केले. त्यांनी 1983 मध्ये अस्थराम या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. मेघनाथन यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या पार्थिवावर शोरनूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List