हेअर ड्रायरचा स्फोट, शहीद जवानाच्या पत्नीने हात गमावले

हेअर ड्रायरचा स्फोट, शहीद जवानाच्या पत्नीने हात गमावले

कर्नाटकच्या बागलकोट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सैनिकाची पप्नीला केसांना सुकविण्यासाठी हेअर ड्रायर वापरणे चांगलेच महागात पडले आहे. या हेअरड्रायरचा अचानक स्फोट होऊन महिलेचे दोन्ही हात कापण्याची वेळ आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बसम्मा यारानल असे त्या महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच तिने हा हेअर ड्रायर नवीन घेतला होता. तो एका खासगी कुरिअन कंपनीकडून डिलिव्हर करण्यात आला होता. त्या कंपनीच्या पार्सलवर शशिकला नाव आणि नंबर लिहीला होता. ज्यावेळी कुरिअर कंपनीने त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी शशिकला शहराच्या बाहेर होती. अशावेळी शशिकलाने बसम्मा हिला सांगितले होते की, पार्सल घे आणि ते खोलून तपासून बघ. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे, आतापर्यंतच्या तपासात हेअर ड्रायर विशाखापट्टणममध्ये बनवला होता आणि बागलकोटहून पाठवले होते. पोलीस या प्रकरणाची वेगवेगळ्या अॅंगलने चौकशी करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;