अमेरिकेत मोदींचं राज्य नाही हे अदानी विसरले! प्रशांत भूषण यांचा टोला

अमेरिकेत मोदींचं राज्य नाही हे अदानी विसरले! प्रशांत भूषण यांचा टोला

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने लाच व फसवणुकीचे आरोप केले आहेत. गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह 7 जणांनी सौर ऊर्जा कंपनीचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्सची (2 हजार कोटी रुपये) लाच देऊ केली होती. हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गौतम अदानी आणि सागर अदानींविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने प्रसिद्ध केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही ट्विट केले आहे.

गौतम अदानींवरील अमेरिकेतील आरोपपत्रात मोठ्या प्रमाणावर लाचखोरी आणि फसवणुकीच्या 5 गुन्ह्यांचा आरोप आहे. हे आरोप खोडून काढता न येण्यासारख्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर आधारित आहे. त्यात त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अदानी विसरले की अमेरिकेत मोदींचे राज्य नाही, जिथे ते मोदींच्या वशिल्याच्या ईडी, सेबी आणि सीबीआयवर अवलंबून राहून काहीही करून सुटू शकतात, असा टोला प्रशांत भूषण यांनी लगावला आहे.

अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमीशननने अदानी समुहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊ केल्याचा आरोप लगावला आहे. न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ऑफिसने गौतम अदानी यांच्यासह त्यांचा पुतण्या सागर अदानी, एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे कार्यकारी सिरिल कॅबनेस, अदानी ग्रीन एनर्जीचे माजी सीईओ विनीत जैन, एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे माजी सीईओ रणजीत गुप्ता आणि आणि माजी चीफ सेक्रेटरी रुपेश अग्रवाल यांच्यावर फौजदारी आरोप दाखल केले आहेत. फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्टचे उल्लंघन करून लाचखोरीचा कट रचल्याचा आरोपात समावेश आहे.

अदानी आणि त्यांच्या कंपनीतील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऊर्जा कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्स देण्याचे निश्चित केले होते. या कंत्राटामुळे कंपनीला आगामी 20 वर्षांमध्ये 2 अब्ज डॉलर्सहून अधिक नफा होण्याचा अंदाज होता. लाचेचे पैसे जमवण्यासाठी अमेरिकेसह विदेशातील गुंतवणूकदारांची आणि बँकांची फसवणूक केल्याचा आरोप अदानींवर लावण्यात आला आहे. कर्जदार आणि गुंतवणूकदारांपासून हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अदानी समुहाने 3 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्जे आणि रोखे जमा केल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. याच आरोपांतर्गत त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. याप्रकरणी अदानी किंवा अदानी समुहाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

काय आहेत आरोप?

– 2020 ते 2024 दरम्यान अदानीसह सर्व आरोपींनी सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्सची लाच देऊ केली होती. या कंत्राटामुळे कंपनीला आगामी 20 वर्षांमध्ये 2 अब्ज डॉलर्सहून अधिक नफा होण्याचा अंदाज होता.

– याबाबत अदानी यांनी एका हिंदुस्थानी अधिकाऱ्याची भेट घेतली. तर सागर अदानी आणि विनित जैन यांनी यावर काम करण्यासाठी अनेक बैठका घेतल्या.

– सिरिल कॅबनेस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल यांनाही यात आरोपी बनवण्यात आले आहे. या चौघांनीही लाचखोरीच्या योजनेमध्ये ग्रँड ज्युरी, एफबीआय आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनचा तपास थांबवण्याचा कट रचला होता. या चौघांनीही योजनेशी संबंधित ईमेल, संदेश आणि विष्लेषणं डीलिट केली.

– अदानी ग्रीन एनर्जीने कंत्राटासाठी निधी देण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून 3 अब्ज डॉलर्स जमा केले.

– सदर प्रकरणात सहभागी असलेल्या षडयंत्रकर्त्यांनी गौतम अदानी यांना ‘न्युमेरो युनो’ आणि ‘द बिग मॅन’ या सांकेतिक नावांनी खासगीरित्या संबोधले होते. तर लाच देण्याची प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सागर अदानीने आपला मोबाईल फोन वापरला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;