बोटाला शाई लावली, बटण दाबले अन् मतदान केंद्रातच मतदाराचा मृत्यू

बोटाला शाई लावली, बटण दाबले अन् मतदान केंद्रातच मतदाराचा मृत्यू

बोटाला शाई लावली…वोटिंग बटण दाबले अन् हृदयविकाराने मतदान केंद्रातच मतदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी  घटना बुधवारी साताऱयाच्या खंडाळा तालुक्यामधील मोर्वे येथील मतदान केंद्रावर घडली.

श्याम नानासाहेब धायगुडे (67) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राज्यात लोकशाहीचा महोत्सव सुरू असताना शाम नानासाहेब धायगुडे हे मोर्वे येथील मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांनी नावाची चिठ्ठी देऊन ओळखपत्र दाखवून बोटाला शाई लावली. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली. वोटिंग बटण दाबले आणि बीप मशीनचा आवाज येण्याच्या अगोदरच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले.

यावेळी तेथील उपस्थित अधिकारी आणि गावचे पोलीस पाटील यांनी ताबडतोब त्यांना एका खासगी वाहनातून लोणंद येथे उपचारासाठी हलवले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोर्वे गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी पाच वाजता धायगुडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात ही दुखाची घटना घडली असतानाही गावातील नागरिकांनी या लोकशाहीच्या महोत्सवात सामील होत गावातील नागरिकांनी 71 टक्के मतदान केले. इतक्या दुŠखद घटनेनंतरही धायगुडे कुटुंबीयांनी आपले मतदानाचे कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचे कौतुकही होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;