जिवंत मतदाराला ठरवलं मृत; मुंबादेवी मतदारसंघातील घटना

जिवंत मतदाराला ठरवलं मृत; मुंबादेवी मतदारसंघातील घटना

जिवंत मतदाराला मृत घोषित केल्याची घटना मुंबादेवी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर घडली. गोव्याहून खास मतदानासाठी आलेले अँथोनी ब्रिगेन्झा यांच्या नावापुढे मृत असल्याचे दर्शविण्यात आले होते. अखेर बराच काळ वादावादीनंतर त्यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली.

मुंबई सेंट्रलच्या बीआयटी चाळीत राहणारे अँथोनी ब्रिगेन्झा हे मतदान केंद्रावर गेले असता तेथील कर्मचाऱयांनी त्यांना मतदान करण्यास मनाई केली. मतदार यादीनुसार त्यांना मृत घोषित करण्यात आले होते हे ऐकून ब्रिगेन्झा यांना प्रचंड धक्काच बसला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मुंबईत येऊन मतदान केले होते, मात्र यावेळी त्यांना धक्काच बसला.

सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी अँथोनी ब्रिगेन्झा यांना मदत केली. निवडणूक ओळखपत्र आणि आधारकार्ड दाखवल्यानंतर निवडणूक अधिकाऱयांची खात्री पटली. त्यांनी अँथोनी ब्रिगेन्झा यांच्याकडून डिक्लेरेशन फॉर्म भरून घेतला. त्यानंतर ब्रिगेन्झा यांना मतदान करू दिले. डिक्लेरेशन फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची छायांकित प्रत देण्यात यावी, अशीही मागणी ब्रिगेन्झा यांनी केली होती. निवडणूक कार्यालयाच्या रेकॉर्डवरील मृत्यूची नोंद काढून टाकण्यासाठी ही प्रत त्यांनी मागितली. त्यावेळी अधिकाऱयांनी त्यालाही मनाई केली, मात्र अखेर त्यांना ही प्रत देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;