पराभव समोर दिसू लागताच मिंधे गटाचे उमेदवार संजय शिरसाटचा थयथयाट! उपशहरप्रमुखाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुती व मिंधे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांना पराभव समोर दिसू लागताच त्यांनी थयथयाट सुरू केल्याचे दिसून आले. गुरुगोविंदसिंगपुरा भागातील मतदान केंद्राबाहेर थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांना ‘मस्ती आली का तुला? एका मिनिटात नीट करून टाकीन…’ म्हणत बुधवारी दुपारी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढय़ावरच न थांबता. दोन मिनिटांत गायब करून टाकीन! असे म्हणत धमकावल्याचे समोर आले.
यासंदर्भात शिवसेना नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर करून मतदान केंद्रावर संजय शिरसाट यांना ही कसली मस्ती? सत्तेची, पैशाची की आमदारकीची? असा सवाल उपस्थित केला. शेअर केलेल्या व्हिडीओत मिंधे गटाचे उमेदवार शिरसाट शिवीगाळ करून धमकावताना दिसत आहेत. ही घटना गुरुगोविंदसिंगपुरा येथील गुरू तेगबहादूर शाळेच्या मतदान केंद्रावर घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List