प्रणीती शिंदे म्हणजे भाजपची बी टीम -शरद कोळी

प्रणीती शिंदे म्हणजे भाजपची बी टीम -शरद कोळी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे  आणि खासदार प्रणीती शिंदे यांनी आज सकाळी अचानक दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले. या वेळी शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी संताप व्यक्त करत प्रणीती शिंदे या भाजपच्या बी टीम असून, त्यांचे सोलापूर जिह्याच्या राजकारणातून नामोनिशाण मिटविणार असल्याचा इशारा दिला. कार्यकर्त्यांनी दक्षिण सोलापूर तालुका पिंजून काढला आणि भक्कमपणे अमर पाटील यांना साथ दिली. मात्र, सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;