नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा यांनी कोथरूडमध्ये केले मतदान

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा यांनी कोथरूडमध्ये केले मतदान

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघात मतदान केले. काय विश्वास बसत नाही? होय, हे खरे आहे. या नावामुळे कोथरूड मतदारसंघ चर्चेच्या पेंद्रस्थानी आला. थांबा… मतदारयादीत नामसाधर्म्य असलेली अनेक नावे असतात. त्यामुळे गोंधळही उडतो. त्यावरून अनेक गैरसमजही होतात. असाच गैरसमज सध्या कोथरूड मतदारसंघात झाला .

मोदी, गांधी, पवार, शहा ही सर्व मंडळी कोथरूडमध्ये मतदान कसे करणार, यावरून हा गोंधळ उडाला आहे. मात्र, यात नामसाधर्म्य हेच मूळ कारण आहे.

या मतदारसंघात नरेंद्र धीरजलाल मोदी, राहुल अनिल गांधी, शरद रामचंद्र पवार, अमित अशोक शहा, एकनाथ सोमनाथ शिंदे, अजित आत्माराम पवार, संजय एकनाथ राऊत, आदित्य प्रभाकर ठाकरे व रोहित राजेंद्र पवार हे मतदार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;