बारामतीत गोंधळामुळे काही वेळ मतदान ठप्प, कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी; शर्मिला पवार यांचा आरोप

बारामतीत गोंधळामुळे काही वेळ मतदान ठप्प, कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी; शर्मिला पवार यांचा आरोप

शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेतील पेंद्रावर अजित पवार व शरद पवार गटात वाद झाला. या ठिकाणी अजित पवार यांच्या नावाच्या स्लिपा वाटल्या जात असून कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला. दरम्यान, अजित पवार यांनी शर्मिला पवार यांचे आरोप फेटाळून लावले.

महात्मा गांधी बालक मंदिर शाळेत या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून काही काळ मतदान प्रक्रिया थांबली. शर्मिला पवार व अजित पवार यांनीही या केंद्राला भेट दिली.

आमच्या बुथवरील कार्यकर्त्यांना तुझ्याकडे उद्या बघतो, तुला उद्या खल्लास करतो, अशी धमकी विरोधी गटाकडून दिली जात असल्याचा आरोप युगेंद्र यांच्या आई शर्मिला यांनी केला. केला. घरचे लग्न असल्यासारखे विरोधी गटाचे काही पदाधिकारी येथे मतदारांना बोलावून घेत आहेत. उमेदवाराचे नाव, चिन्ह असलेल्या चिठ्ठया त्यांना देत आहेत. खूण करून कोणते बटण दाबायचे ते सांगत आहेत. यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या केंद्राला भेट दिली. अजित पवार यांनी शर्मिला यांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. पवार म्हणाले, त्यांनीच माझ्या पोलिंग एजंटला मतदान पेंद्राबाहेर काढले. हा अधिकार त्यांचा नसून तो निवडणूक अधिकाऱयाचा आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, ते निवडणूक अधिकारी तपासतील.  शिवाय त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली तर चौकशीत खरे-खोटे होईल असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;