खलील अहमदच्या जागी यश दयालची निवड

खलील अहमदच्या जागी यश दयालची निवड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या राखीव खेळाडूंच्या यादीत असलेल्या खलील अहमदला दुखापत झाल्याने त्याच्या जागी यश दयालची संघात निवड करण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान संघात स्थान देण्यात आलेल्या दयालला नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मध्ये स्थान देण्यात आले होते. पण त्याला एकाही सामन्यात संधी लाभली नाही. खलीलला सरावादरम्यान दुखापत झाल्यामुळे तो नेटमध्ये गोलंदाजीही करू शकत नव्हता. त्यामुळे त्याला काही दिवस विश्रांती देण्यात आली आहे. हिंदुस्थानी संघाला सरावादरम्यान मिचेल स्टार्कसारखा गोलंदाज हवा, अशी बीसीसीआयची भावना आहे. दयालला ऑस्ट्रेलियात संघासाठी कसोटी खेळता यावी म्हणून निवडण्यात आले होते. मात्र त्याला दक्षिण आफ्रिकेत धाडले. जर खलील संघाबरोबर राहून गोलंदाजी करू शकत नसेल तर त्याला इथे ठेवण्यात काहीही अर्थ नसल्यामुळे मायदेशात पाठवले जात असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;