कलिनात धुडगूस घालणाऱया भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांकडून चोप; पैसे वाटणाऱ्यांनाही स्थानिकांनी पिटाळले

कलिनात धुडगूस घालणाऱया भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांकडून चोप; पैसे वाटणाऱ्यांनाही स्थानिकांनी पिटाळले

विधानसभा निवडणुकीच्या आदल्याच दिवशी विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाच कोटय़वधी रुपये वाटताना ‘बविआ’ने रंगेहाथ पकडल्यामुळे प्रचंड गदारोळ झाला असताना आज कलिनातही भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र भाजपचा हा ‘नोट जिहाद’ निष्ठावंत मतदारांनी धुडकावून लावत भाजप कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. तर शास्त्रीनगर म्युनिसिपल स्कूल येथे धुडगूस घालणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी चांगलाच चोप देत पिटाळून लावले.

कलिना विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे संजय पोतनीस सलग दोन वेळा निवडून आले असून या वेळी ते हॅट्ट्रिक करणार असल्याचे स्पष्ट चित्र मतदार संघात दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे उमेदवार अमरजित सिंग यांचा पराभव अटळ आहे. मात्र पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यामुळे भाजपकडून आज मतदानाच्या दिवशी मतदारांना पैशाचे वाटप, धुडगूस घालण्याचे प्रकार करण्यात आले. यामध्ये डिमेलो पंपाऊंड, लसूनवाडी येथे दुपारच्या सुमारास पैशाचे वाटप करणाऱया भाजपच्या कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी अक्षरशः पिटाळून लावले. तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शास्त्रीनगर म्युनिसिपल स्कूल येथे सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास बोगस मतदान करून धुडगूस घालण्याचा  प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी खुद्द शिवसेनेचे उमेदवार संजय पोतनीस आणि शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना अक्षरशः हाकलून दिले. या वेळी एसीपी आल्यामुळे गंभीर प्रश्न टळल्याचेही पोतनीस म्हणाले. यानंतर भाजपकडून 50हून जास्त सिक्युरिटी गार्ड आणून दहशत माजवण्याचे कारस्थानही करण्यात आले. तर काही ठिकाणी मतदारांना जबरदस्ती ‘नोटा’चे बटण दाबण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही संजय पोतनीस यांनी केला.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;