सोलापूर जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.09 टक्के मतदान

सोलापूर जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.09 टक्के मतदान

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी एकूण 57.09 टक्के मतदान झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार असून आज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 21 लाख 97 हजार 236 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार अकरा लाख तीस हजार 906, स्त्री मतदार दहा लाख 66 हजार 231 तृतीयपंथी 69 मतदाराने मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी 57.09% झालेली आहे.

विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे.

244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख 94 हजार 10 मतदारांनी मतदान केले (58.57%).

245 माढा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख चार हजार 541 मतदारांनी मतदान केले, 57.99%.

246 बार्शी विधानसभा मतदारसंघात दोन लाख दहा हजार 860 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 62.48%.

247 मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात एक लाख 98 हजार 338 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 59.84% आहे.

248 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख 68 हजार 29 मतदारांनी मतदान केले असून 51. 49 टक्के मतदान झालेले आहे.

249 सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 11937 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी 49.60% आहे.

250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 20262 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 58.48% आहे.

251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख 98 हजार 790 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 51.94 टक्के आहे.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 2 हजार 446 मतदारांनी मतदान केलेले आहे.
मतदानाची टक्केवारी 54.18.

253 सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 2,14,423 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 64.30% आहे.

254 माळशिरस अनुसूचित जाती मतदार संघात एकूण दोन लाख नऊ हजार चारशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्या असून मतदानाची सरासरी टक्केवारी 59.90% आहे.
**

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;