श्वेता तिवारी 8 वर्षांनी लहान अभिनेत्याशी केलं तिसरं लग्न? व्हायरल फोटोंमागचं सत्य काय?

श्वेता तिवारी 8 वर्षांनी लहान अभिनेत्याशी केलं तिसरं लग्न? व्हायरल फोटोंमागचं सत्य काय?

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येते. श्वेताने आतापर्यंत दोन वेळा लग्न केलं असून दोनदा तिचा घटस्फोट झाला आहे. या दोन्ही घटस्फोटादरम्यान श्वेताने तिच्या पूर्व पतींवर अनेक आरोप केले होते. अशातच श्वेताचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिने तिसऱ्यांदा लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोंमध्ये श्वेता तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी लहान असलेला अभिनेता विशाल आदित्य सिंहशी लग्न करताना दिसून येत आहे. श्वेता आणि आदित्यने एकाच रंगसंगतीचे कपडेसुद्धा परिधान केले आहेत आणि दोघांच्या गळ्यात वरमाळा आहेत. श्वेताच्या भांगेत सिंदूरही पहायला मिळतोय. हे व्हायरल फोटो पाहून श्वेता तिवारीचे चाहते पेचात पडले आहेत.

फोटोंमागील सत्य

श्वेताचे फोटो हे खरे नसून कोणीतरी मॉर्फ करून व्हायरल केले आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यांच्या लग्नाचे खरे फोटो मॉर्फ करून त्यावर श्वेता आणि विशाल आदित्य सिंहचा चेहरा एडिट करण्यात आला आहे. त्यामुळे श्वेता आणि विशालच्या लग्नाचे हे फोटो पूर्णपणे खोटे आहेत. श्वेता आणि विशाल हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या दोघांनी ‘खतरों के खिलाडी’मध्ये भाग घेतला होता. याआधी दोघांच्या अफेअरच्याही चर्चा होत्या. मात्र दोघांनी केवळ मैत्री असल्याचं स्पष्ट केलं होतं.

श्वेताचं पहिलं लग्न अभिनेता राजा चौधरीशी झालं होतं. या दोघांना पलक तिवारी ही मुलगी आहे. पलक आता 24 वर्षांची झाली असून तीसुद्धा आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात काम करतेय. श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. श्वेता आणि राजाचा संसार हा जवळपास नऊ वर्षे टिकला होता. 2007 मध्ये तिने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तर 2012 मध्ये दोघं कायदेशीररित्या विभक्त झाले. त्यानंतर तिने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं होतं. या लग्नातून तिला रेयांश हा मुलगा आहे. श्वेता आणि अभिनवचंही नातं फार काळ टिकू शकलं नाही. श्वेताने अभिनवरही बरेच आरोप केले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;