मतदानासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली भारतात; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हे खूपच दु:खद….”

मतदानासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली भारतात; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हे खूपच दु:खद….”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करायला आज सकाळपासूनच सर्वांची आपापल्या भागात गर्दी होती. सामान्य असो किंवा सेलिब्रेटी असो सर्वांनीच त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यासाठी जे बाहेर राहतात त्या नागरिकांनीही आपल्या गावी, शहरांत जाऊन मतदान केलं. पण मतदानाचा हक्क बजवायला एक अभिनेत्री चक्क 32 ते 36 तास प्रवास करत न्यूझीलंडहून भारतात आली.

आज संपूर्ण राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरू आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. त्यातच आता चर्चा होतेय अभिनेत्री गिरीजा ओकची जी मतादानाचं आपलं कर्तव्य पार पाडायला चक्क न्यूझीलंडहून प्रवास करून भारतात आली. गिरीजाने भारतात आल्यानंतर पुण्यात जाऊन मतदान केलं आहे.

अभिनेत्री गिरीजा ओक मतदान केल्यानंतर तिचा व्हिडीओ ही शेअर केला आहे. त्यात ती म्हणाली की, “मी मतदान केलं, असं लोक आजकाल एकमेकांना सांगतात. कारण इतर लोकं करत नाहीत. मला असं वाटतं, यात वेगळी काहीच गोष्ट नाही. प्रत्येकाने मतदान करायलाच हवं. मी आज न्यूझीलंडहून 32 तास प्रवास करून भारतात आले. त्यानंतर पुन्हा चार-पाच तासांचा प्रवास करून पुण्यात येऊन मतदानाला आले.”

गिरीजा ओक पुढे म्हणाली की, “प्रत्येकाची हीच अपेक्षा असते नेत्यांनी जी आश्वासने दिली आहेत, ती त्यांनी पूर्ण करावीत. मी ज्या विभागात राहते, तिथल्या सगळ्याचं उमेदवारांबद्दल मला बऱ्यापैकी माहीत आहे. त्यामुळे माझा मतदान करण्याचा निर्णय खूप क्लिअर होता. पण, मतदानाची टक्केवारी खूप दुःखद आहे” असं म्हणत गिरीजाने मतदारांची असलेली संख्या पाहाता खंत व्यक्त केली..

तसेच पुढे ती म्हणाली “ऐरवी हे बरोबर नाही ते बरोबर नाही हे बोलायला आवडतं. पण, मतदानाचा हक्क बजावला नाही तर बोलण्याचा हक्क आपल्याला नसून शकतो. तर मला असं वाटतं मतदानाचा हक्क आपण प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. कारण त्याला पर्याय नाहीये. या दिवशी खूप प्रेमाने ट्रीप प्लॅन करतात. हे मला अजिबात पटतं नाही. पण, याबद्दल लोकांना कसं सांगावं कळतं नाही. मी म्हटलं तसं 32 ते 36 तास प्रवास करून मी मतदानाला आले. मतदानासाठी काहीच कारण द्यायला नाही पाहिजे. तुम्ही मतदान करायलाच पाहिजे” असं म्हणत गिरीजाने प्रत्येकाला मतदान करणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदान झालं आहे. महायुती, महाविकास आघाडी या दोन युत्यांसह अनेक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. या अनेक पक्षातील एकूण 4 हजार 136 उमेदवारांचं भवितव्य अखेर मतदानाच्या माध्यमातून मतदाराने ठरवलं आहे, आणि ते कोण आहे हे निकाल्याच्या दिवशी समोर येईलच.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;