तावडेंचा काल भिजलेला कोंबडा झाला होता, मुंबईला गेल्यावर त्यांना कंठ फुटला; हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल

तावडेंचा काल भिजलेला कोंबडा झाला होता, मुंबईला गेल्यावर त्यांना कंठ फुटला; हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये होते. यावेळी तावडे यांनी पैसे वाटप केले. तसेच त्यांच्या खोलीत 5 कोटी होते, त्याच्यातील फक्त 10 लाख दाखवण्यात आले, असा आरोप बविआचे हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. आता बुधवारी पुन्हा एकदा ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मला सोडवा, माझी चूक झाली, मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे काल करत होते. मला त्यांनी 25 फोन केले आहेत असा दावा केल्यानंतर बुधवारी पुन्हा एखदा हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. विनोद तावडे यांची अवस्था काल भिजलेल्या कोंबडी सारखी झाली होती, मला सारखं बोलावत होते, असे ठाकूर म्हणाले. विवांता हॉटेल आमदार हितेंद्र ठाकूर यांचा असल्याचा दावा विनोद तावडे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना माझं हॉटेल असेल तर हॉटेल माझ्या नावावर करून द्या, काहीही आरोप करू नये असा दमही ठाकूर यांनी दिला. हॉटेल माझे आहे तर माझ्या नावावर करून द्या,मी तावडे यांचा आभारी राहीन, असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.

भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांनी आमची मतं वाढतील, असा दावा केला. त्यावर पाच कोटी वाटून झाले असतील, त्यामुळे असा दावा ते करत असल्याचा टोलाही ठाकूर यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;