संजय शिरसाटांच्या पायाखालची वाळू सरकलीच नाही तर गायब झाली आहे; कार्यकर्त्यांना धमकावल्याने अंबादास दानवेंचा हल्लाबोल

संजय शिरसाटांच्या पायाखालची वाळू सरकलीच नाही तर गायब झाली आहे; कार्यकर्त्यांना धमकावल्याने अंबादास दानवेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असून मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संजय शिरसाट काही कार्यकर्त्यांना शिवीगाळ आणि दादागिरी करताना दिसत आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ शेअर करत शिरसाट यांच्या खुलेआम धमक्यांची दखल घेऊन कारवाई करणार का असा सवालही केला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये संजय शिरसाट काही नागरिकांना मस्ती आली का तुला…अशी दमदाटी करत शिव्या घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत दानवे यांनी संजय शिरसाट यांची ही कोणती पद्धत बोलायची. या खुलेआम धमक्यांची दखल घेऊन @ECISVEEP @CEO_Maharashtra आणि @DGPMaharashtra कारवाई करणार का? असा थेट सवालच केला आहे. शिवाय पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;