शेजारी हनुमान चालीसा,चेहऱ्यावर मोठी पट्टी; अपघातानंतर कश्मीरा शाहाचा पहिला फोटो समोर

शेजारी हनुमान चालीसा,चेहऱ्यावर मोठी पट्टी; अपघातानंतर कश्मीरा शाहाचा पहिला फोटो समोर

कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी तथा अभिनेत्री कश्मीरा शाहचा परदेशात अपघात झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली होती. रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत तिने ही माहिती शेअर केली होती. आता तिने सोशल मीडियावर तिचा अपघानंतरचा फोटो पोस्ट केला आहे.

कश्मीरा शाहच्या अपघाताची माहिती मिळताच सर्वांनीच तिच्याविषयी चिंता व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर तिच्याबद्दल फार काही अपडेट आले नव्हते. एवढच नाही तर, अपघाताच्या बातमीने कश्मीराचा पती कृष्णा खूप अस्वस्थ झाला होता. त्याने सगळी कामे थांबवून कश्मीराच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, कश्मीराने त्याला नकार दिला होता. तसेच कृष्णानेही ती सुरक्षीत असल्याची खात्री केल्यावरच जाणे रद्द केल्याचे सांगितले होते.

अपघतानंतरचा पहिला फोटो

कश्मीराने अपघतानंतरचा तिचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्या नाकावर पट्टी बांधल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी कश्मीराचा परदेशात अपघात झाला होता. यासंबंधीची माहिती देताना तिने रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर केला होता. आता अपघातानंतर कश्मीराने त्याची सविस्तर माहिती देत एक फोटो शेअर केला आहे.

कश्मीराने या पोस्टमध्ये या अपघातातून ती कशी बचावली हे सांगताना तिने आपल्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. कश्मीरा शाहने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बेडवर झोपलेली असून, तिच्या नाकावर मोठी पट्टी दिसत आहे. तिच्या शेजारी ‘हनुमान चालीसा’ही ठेवलेली आहे. तसेच ती तिच्या डॉक्टरांचा हात हातात घेत त्यांचे आभार मानतानाही दिसत आहे. अपघातानंतर चाहत्यांनी तिला पाठवलेल्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी तिने खास पोस्ट लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

चाहत्यांचे मानले आभार

फोटो पोस्ट करत कश्मीराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्या सोशल मीडिया कुटुंबातील मित्रांनो, तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी खूप आभार. तुमच्या प्रार्थनांमुळे मला खूप आधार मिळाला आहे. अपघातात काचेच्या तुकड्यांमुळे माझा चेहरा पूर्णपणे जखमी होऊ शकला असता; पण देवाच्या कृपेने असं काही झालं नाही. फक्त माझ्या नाकाला दुखापत झाली. तुमच्या शुभेच्छांमुळे मी बरी होत आहे.”

चाहत्यांनी तिचा हा फोटो पाहून तिला काळजी घेण्याची विनंती केली आहे.तसेच ती सुरक्षित आहे त्याबद्दल तिच्याविषयी प्रेम आणि आनंद व्यक्त केला आहे.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;