दर्ग्याला भेट दिल्यामुळे राम चरण वादाच्या भोवऱ्यात, बायको म्हणाली, ‘तो स्वतःच्या धर्माचं पालन करतो आणि…’

दर्ग्याला भेट दिल्यामुळे राम चरण वादाच्या भोवऱ्यात, बायको म्हणाली, ‘तो स्वतःच्या धर्माचं पालन करतो आणि…’

Upasana Kamineni on Ram charan visit Dargah: दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता राम चरण याने नुकताच एका दर्ग्याला भेट दिली. राम चरण याने दर्ग्याला भेट दिल्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दर्ग्याला भेट दिल्यामुळे अनेक अभिनेत्यावर टीका केली आहे. स्वतःच्या पतीवर होत असलेली टीका पाहाता राम चरण याच्या पत्नीने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या राम चरण याची पत्नी उपासना हिची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल हत आहे.

उपासना हिने पतीचा एका फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिली आहे. उपासना म्हणाली, ‘राम चरण स्वतःच्या धर्माचं पालन करतो, पण दुसऱ्याच्या धर्माचा आदर देखील करतो…’ सध्या सर्वत्र राम चरण याची चर्चा रंगली आहे.

उपासना हिने अभिनेत्या जो फोटो पोस्ट केला आहे, त्या फोटोमध्ये राम चरण खाली मान घालून उभा असलेला दिसत आहे. अभिनेत्याने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि गळ्यात माळा घातल्या आहे. गायक मोहित चौहान सोबतच अनेक लोकं अभिनेत्याच्या भोवती दिसत आहे.

अभिनेत्याचा फोटो पोस्ट करत पत्नी उपासना म्हणाली, ‘आस्था एकत्र आणते विभक्त करत नाही. भारतीय असल्याच्या नात्याने आम्ही देवापर्यंत पोहोचण्याच्या सर्व मार्गांचा सन्मान करतो. एकताच आमची ताकद आहे…’ पोस्ट शेअर करत उपासना हिने #OneNationOneSpirit #jaihind असे हॅशटॅग देखील दिले आहेत.

 

 

एवढंच नाही तर उपासनी पती राम चरण याची बाजू मांडत म्हणाली, ‘राम चरण स्वतःच्या धर्माचा पालन करतो आणि दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करतो…’, उपासना हिच्या सोशल मीडिया पोस्टवर नेटकरी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

राम चरण याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता प्रचंड धार्मिक आहे. अनेकदा अनवाणी पायानं तो देवदर्शन करताना दिसतो. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी देखील अभिनेता अनेकदा गेला आहे. राम चरण याचे आई – वडील देखील प्रचंड धार्मिक आहे. अभिनेत्या कुटुंबात धार्मिक वातावरण आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;