तुझा मर्डर आज फिक्स आहे; सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना धमकी, नांदगावमध्ये मोठा राडा

तुझा मर्डर आज फिक्स आहे; सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना धमकी, नांदगावमध्ये मोठा राडा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच नाशिकमधील नांदगावमध्ये मोठा राडा झाला आहे. मिंधे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारीही झाली.

सुहासे कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड मजुरांना डांबून ठेवले होते. या मजुरांना कांदे यांच्याकडून पैशांचे वाटपही होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर समीर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथे रेड टाकली. समीर भुजबळ यांनी रेड करत सर्व लोकांना पकडले. याची माहिती मिळताच सुहास कांदे यांनी घटनास्थळी येऊन समीर भुजबळ यांना तुझा खून करून टाकेन, तुझा मर्डर आज फिक्स आहे अशी धमकी दिली. एवढेच नाही तर पोलिसांनाही अरेरावी केली. चे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


नांदगावच्या दोन उमेदवारांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच त्यांना रोखले. सुहास कांदेंसोबतचे लोक मतदारसंघातीलच असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;