या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं कळकळीचं आवाहन
अभिनेता अक्षय कुमारने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रावरील व्यवस्था चांगली असल्याचं त्याने यावेळी म्हटलंय. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने मतदान करावं, असं आवाहन त्याने केलंय.
माझी सर्वांत महत्त्वपूर्ण जबाबदारी मी पार पाडली आहे. कळकळीचं आवाहन.. अजिबात कंटाळा न करता सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा, असं आवाहन अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलंय.
'करा आज योग्य सिलेक्शन, टुडे इज द डे ऑफ इलेक्शन, समाजात हवं असेल जर परफेक्शन, तर करू नका या संधीचं रिजेक्शन,' अशी पोस्ट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिली आहे.
'माझं मत… ऐक्यासाठी… विकासासाठी… भयमुक्त सुरक्षित वातावरासाठी! माझं मत शेतकऱ्यांसाठी… दुर्बल घटकांसाठी! माझं मत जातीय सलोख्यासाठी… महाराष्ट्रधर्मासाठी! शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी,' अशी पोस्ट लिहित दिग्दर्शक हेमंत ढोमेनं मतदानानंतरचा हा फोटो शेअर केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.









Comment List