रणवीर-दीपिकाने प्रभादेवीतील अपार्टमेंट दिलं भाडेतत्त्वावर; एका महिन्याचं भाडं ऐकून व्हाल चकीत!

रणवीर-दीपिकाने प्रभादेवीतील अपार्टमेंट दिलं भाडेतत्त्वावर; एका महिन्याचं भाडं ऐकून व्हाल चकीत!

नुकतंच आई-बाबा बनलेल्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी मुंबईतील प्रभादेवी इथलं अपार्टमेंट भाडेतत्त्वावर दिलं आहे. प्रभादेवीमधील ‘ब्यू मोंडे टॉवर्स सहकारी गृहनिर्माण संस्था लि.’मध्ये रणवीर-दीपिकाचं आलिशान घर आहे. पश्चिम आणि मध्य उपनगरं तसंच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वरळी-वांद्रे सी लिंक यांसारख्या प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा परिसर आहे. ‘स्क्वेअर यार्ड्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर-दीपिकाच्या या अपार्टमेंटचा बिल्ट-अप एरिया 3,245 चौरस फूट असून कारपेट एरिया हा 2,319.50 इतका चौरस फूट आहे. यामध्ये तीन कारसाठी पार्किंगची जागादेखील समाविष्ट आहे. या महिन्यात या अपार्टमेंटचा लीज करार पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे.

रणवीर-दीपिकाने दरमहा 7 लाख रुपये भाडेतत्त्वावर हे अपार्टमेंट दिलं आहे. यासाठी 21 लाख रुपयांची सेक्युरिटी डिपॉझिट घेण्यात आली आहे. पहिल्या 18 महिन्यांसाठी याचं भाडं प्रतिमहा 7 लाख रुपये असेल. त्यानंतर उर्वरित 18 महिन्यांसाठी ते भाडं वाढवून 7.35 लाख रुपये करण्यात येईल. हे अपार्टमेंट सुसज्ज असून त्यात जिम, स्विमिंग पूल आणि अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींचाही समावेश आहे.

याच ब्यू मोंडे टॉवर्समध्ये दीपिकाचं आणखी एक अपार्टमेंट आहे. या टॉवरमध्ये 2,3,4 आणि 5 बीएचके अपार्टमेंट्स आहेत. प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरासाराख्या इतरही अनेक प्रतिष्ठित स्थळं या परिसरात आहेत. हा परिसर दादर बीच आणि फिनिक्स मॉलच्या जवळ आहे. याशिवाय मुंबईतील वांद्र्यातही रणवीर-दीपिकाचा प्रीमिअम अपार्टमेंट आहे. त्याचप्रमाणे अलिबागमध्येही 2.25 एकर परिसरात पसरलेला त्यांचा बंगला आहे. 2022 मध्ये तिने अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याजवळ तब्बल 119 कोटी रुपयांचा ‘फोअर-प्लेक्स’ खरेदी केला आहे. फोअर-प्लेक्स म्हणजेच चार स्वतंत्र अपार्टमेंट्स असलेली निवासी इमारत. या प्रत्येक अपार्टमेंटचं प्रवेशद्वार वेगवेगळं असतं.

दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या मुलीचं नाव ‘दुआ’ असं ठेवलं आहे. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं. दीपिकाला मुलगी होताच रणवीरची मोठी इच्छा पूर्ण झाली असं म्हटलं जातंय. रणवीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत ही खास इच्छा बोलून दाखवली होती. त्याला मुलगी हवी होती आणि अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. मुलीच्या जन्मानंतर रणवीर आणि दीपिकाने इन्स्टाग्रामवर ‘बेबी गर्लचं स्वागत’ अशी पोस्ट लिहित त्याखाली जन्मतारखेचा उल्लेख केला होता. या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;