कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासांत 7.38 टक्के मतदान, कागल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 8.78 टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासांत 7.38 टक्के मतदान, कागल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 8.78 टक्के मतदान

राज्यात नेहमीच मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर राहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचे मतदान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 80 टक्के हून अधिक होण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली. आज सकाळी सात पासूनचच जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात जिल्ह्यात 7.38 टक्के मतदान झाले होते. तर सर्वाधिक कागल मतदार संघात 8.78 टक्के मतदान झाले होते. सकाळी नऊ नंतर मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.

जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची विधानसभा मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी सकाळी 9 पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अशी, चंदगड -6.78,राधानगरी – 6.67,कागल-8.78, कोल्हापूर दक्षिण-7.25,करवीर-7.76,कोल्हापूर उत्तर -8.25,शाहूवाडी-7.23,हातकणगंले-6.20,इचलकरंजी -7.47 आणि शिरोळ मतदारसंघात 7.53 टक्के मतदान झाले होते.

बीएलओंचा फटका ; मतदार यादीत नाव शोधण्यासाठी राजकीय पक्षांच्या बुथवर मतदारांच्या रांगा

जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने प्रत्येक मतदार संघात मतदारांपर्यंत बीएलओ मार्फत मतदान केंद्र आणि खोली क्रमांक याची माहिती असलेल्या मतदान स्लिपचे वाटप करण्यात आले.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 99 टक्के अशा स्लीप बीएलओ मार्फत मतदारापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे सांगितले होते.पण प्रत्यक्षात ठिकठिकाणी अशा स्लिप पोहोचल्या नाहीत. काही घरांमध्ये अशा अर्धवट स्लिप पोहोचल्याने,मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्यासाठी केंद्रा भोवती असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या बुथ मध्ये आपली नावे शोधावी लागत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;