ए. आर. रेहमान यांच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया, म्हणाल्या, ‘आम्हाला आनंद होईल जेव्हा…’

ए. आर. रेहमान यांच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया, म्हणाल्या, ‘आम्हाला आनंद होईल जेव्हा…’

AR Rahman And Saira Banu Divorce: भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांनी देखील मोठा धक्का बसला आहे. सांगायचं झालं तर, खुद्द ए आर रेहमान यांनी पत्नीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान त्यांच्या मुलांची देखील आई – वडिलांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांना तीन मुलं आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. ए आर रेहमान यांची लेक रहीमा सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हणाली, ‘आम्हाला प्रचंड आनंद होईल जेव्हा तुम्ही प्रत्येक जण आमच्या गोपनीयतेचा आदर कराल…’, दुसऱ्या मुलीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

आई – वडिलांच्या घटस्फोटावर लेक खातीजा म्हणाली, ‘आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतोय, कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा सन्मान करा… आम्हाला समजून घेण्यासाठी आभार…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ए आर रेहमान यांच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

सायरा बानू यांचं जनतेला आवाहन

नात्यातील वेदनांमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे सायरा बानू यांनी आवर्जून सांगितलं आहे. सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयता आणि समजून घेण्याची विनंती करत आहेत. कारण सायरा बानू त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक टप्प्यातून जात आहेत…

का घेतला घटस्फोटाचा निर्णय?

सायरा बानू यांच्या वकील वंदना शाह यांनी एक निवेदन जारी केलं आणि घटस्फोटाची घोषणा केली. ‘अनेक वर्षांच्या लग्नानंतर मिसेस सायरा यांनी पती ए आर रहमान यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नात्यात आलेल्या तणावामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं वकील म्हणाल्या.

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 29 वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं. 1995 मध्ये ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न झालं. दोघांनी घरच्यांच्या सहमतीने अरेंज मॅरेज केलं होतं. पण आयुष्यात कठीण वळण आलं आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;