परळीतील धर्मापुरी मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरू, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आरोप

परळीतील धर्मापुरी मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरू, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आरोप

परळीतील धर्मापुरी मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला. सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप करत राजेसाहेब देशमुख यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातला.

परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी लढत आहे. राजेसाहेब देशमुखांच्या आरोपामुळे मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी सात वाजल्यापासून सर्व मतदारसंघात मतदानासाठी मतदारांच्या रांगा पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Maharashtra Assembly Election Live – “महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र बनवायचे नसेल तर…”, संजय राऊत यांचे ट्विट

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;