अकोल्यात बीआर हायस्कूलमध्ये मतदानयंत्र बंद, अखेर सव्वातासाने मतदान सुरू

अकोल्यात बीआर हायस्कूलमध्ये मतदानयंत्र बंद, अखेर सव्वातासाने मतदान सुरू

राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली. मात्र अकोल्यात सात वाजल्यापासूनच मतदानयंत्र बंद पडले होते. यामुळे मतदानाला सुरवात होऊन सव्वा तास उलटून गेला तरी यंत्र सुरू न झाल्याने मतदानाला अद्याप सुरूवात झाली नव्हती. अखेर सव्वा तासानंतर मशिन सुरू झालं आणि मतदानाला सुरुवात झाली.

सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी मतदानासाठी केंद्रावर हजेरी लावली. मात्र मतदानयंत्र बंद असल्याने मतदारांना माघारी परतावे लागले. यामुळे मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. मात्र अखेर तांत्रिक दुरुस्तीनंतर मतदानाला सुरुवात झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;