हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही! अनिल देशमुख यांचा भाजपला इशारा

हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही! अनिल देशमुख यांचा भाजपला इशारा

गाडीवर केलेल्या दगडफेकीत डोक्याला  गंभीर दुखापत झालेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आज संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अनिल देशमुखांवर तुम्ही गोटे मारा किंवा गोळय़ा झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही. मी सगळय़ांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला. दरम्यान, या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात चार अज्ञात युवकांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास काटोलच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱयांकडे देण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;