पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावर हल्ला

पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावर हल्ला

पुण्यात विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले असून मतदानाच्या पूर्वसंध्येला  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. महाविकास आघाडीचे वडगाव शेरीचे उमेदवार बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णालयात टिंगरे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. याप्रकरणी तपास करणाऱया पोलीस अधिकाऱयांची भेट घेऊन कारवाईची जलद तपासाची मागणी केली. पर्वती मतदारसंघातील बिबवेवाडी परिसरात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करुन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलवर चित्रीकरण केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;