मुंबईत हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात

मुंबईत हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात

विधानसभेसाठी होणारे मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. हजारो पोलिसांना फौजफाटा शहरात ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहे.

मुंबई पोलीस दलातील पाच अपर पोलीस आयुक्त, 20 पोलीस उपआयुक्त, 83 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व 25 हजारांहून अधिक पोलीस अंमलदार तसेच तीन दंगल नियंत्रण पथके (आरसीपी) बंदोबस्त कामी तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच वाहतूक विभागामार्फत स्वतंत्रपणे 144 अधिकारी व एक हजाराहून अधिक पोलीस अंमलदार बंदोबस्ताकरिता नियुक्त करण्यात आले आहेत. त्याच्या जोडीला चार हजारांहून अधिक होमगार्ड असतील. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी व एसएसटी, एफएसटीसोबत 26 केंद्रीय सुरक्षा दले, राज्य सुरक्षा दलेदेखील तैनात राहणार आहेत. दरम्यान काही संशयास्पद हालचाली किंवा गडबड वाटल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;