गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलबाबत मोठा खुलासा, अमेरिकेत घेतले होते ताब्यात

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलबाबत मोठा खुलासा, अमेरिकेत घेतले होते ताब्यात

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिनश्नोई याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोलला हिंदुस्थानशी संबंधित कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले नाही. अशी माहिती मिळत आहे.

बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी लॉजिस्टिक्स आणि शस्त्रे खरेदी करण्यात त्याचा हात आहे असा आरोपही त्याच्यावर आहे. याच पार्श्वभूमिवर कॅलिफोर्नियातील अंमलबजावणी पथकाने अनमोल बिनश्नोई याला ताब्यात घेतले होते.मात्र त्याचा हिंदुस्थानातील कोणत्याही प्रकरणात संबध नसून अमेरिकेतील स्थानिक कागदपत्रांमधील त्रुटींमुळे त्याला ताब्यात घेण्यात आल्यीची माहिती सुत्रांनी दिली आहे.मात्र अजूनही तो पोलिसांच्या ताब्यात आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल कॅनडामध्ये राहत असून तो वारंवार अमेरिकेत जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.अनमोल अमेरिकेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रस्ताव पाठवला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अलिकडेच अनमोल बिष्णोईबद्दल माहिती देणाऱयाला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. एनआयएने अनमोलविरोधात 2022मध्ये दोन प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले.अनमोल बिश्नोईला हिंदुस्थानात आणण्याची शक्यता नसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;