विरारमध्ये पुन्हा तेच! तावडेंनंतर मिंधे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना पकडले, धूधू धुतले

विरारमधील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करत असताना त्यांना रंगेहाथ पकडल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. त्यानंतर बरेच तास त्या विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडे यांना अडवून ठेवण्यात आले होते. याच दरम्यान आणखी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एका मिंधे गटाच्या कार्यकर्त्याला देखील पैसे वाटप करताना पकडल्याचे समोर आले आहे. या कार्यकर्त्याला बविआच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला. सुदेश चौधरी असे त्याचे नाव असून तो मिंधे गटाचा तालुकाप्रमुख आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;