ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा; अभिषेक जे बोलला ते ऐकूण अमिताभ भावुक, बिग बींच्या डोळ्यात अश्रू, Video

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा; अभिषेक जे बोलला ते ऐकूण अमिताभ भावुक, बिग बींच्या डोळ्यात अश्रू, Video

अभिनेता अभिषेक बच्चन आणि वडील अमिताभ बच्चन यांच्यामध्ये एक चांगली बॉन्डिग आहे. ज्याचा प्रत्यय पुन्हा एकदा एका शोमध्ये आला.सध्या बच्चन कुटुंब चर्चेमध्ये आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटासंबंधित बातम्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे या सर्व अफवा असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र बच्चन कुटुंबात नेमकं काय सुरू आहे, याबाबत अजूनही त्यांच्या चाहत्यांना माहिती होऊ शकलेलं नाही. निम्रत कौरमुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात आहे, मात्र याबाबत अद्यापही बच्चन कुटुंबातील कुठल्याही सदस्यानं अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही.

बच्चन कुटुंबातील व्यक्तींचं एकमेंकांबद्दलच प्रेम किती आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन आपले वडील बिग बी बद्दल असं काही बोलतो, ज्यामुळे अमिताभ बच्चन चांगलेच भावुक झाले, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

अभिषेक बच्चन शुजीत सरकारने दिग्दर्शीत केलेला चित्रपट ‘आय वाटं टू टॉक’मध्ये भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.मात्र हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक बच्चन हा दिग्दर्शकासोबत टीव्हीवरील प्रसिद्ध क्विज शो ‘कौन बनेगा करोड़पती’मध्ये दिसणार आहे. बच्चन कुटुंबाच्या घरात सध्या सगळं अलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र असं असताना देखील या शोमध्ये अभिषेक बच्चन आपल्या वडिलांबद्दल जे बोलला ते ऐकूण अमिताभ बच्चन भावुक झाले. हा व्हिडीओ प्रचंड व्हायर होत आहे.

 

नेमकं काय म्हटलं अभिषेकने

अभिषेकने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की,’पा मला माहिती नाही मी जे बोलतोय ते बरोबर आहे की चुकीचं, पण मला अशा आहे की मी जे बोलत आहे त्याला लोक चुकीचं समजणार नाहीत. आज आम्ही इथे बसलो आहोत, रात्रीचे दहा वाजले आहेत.पहाटे साडेसहा वाजता माझे वडील घरातून बाहेर पडले होते. कारण आम्हाला सकाळी आरामात आठ- नऊ वाजता उठता यावं, कोणी यावर फार बोलत नाही की एक वडील आपल्या मुलांसाठी काय करतात, कारण ते जे करत असतात’ ते खूप शांततेत करतता असं अभिषेक बच्चन याने म्हटलं आहे. हे एकूण अमिताभ बच्चन चांगलेच भावुक झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;