देख रहा है विनोद! व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका

देख रहा है विनोद! व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका

अवघ्या काही तासांनी संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे वसई विरारमध्ये पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. बहुजन विकास आघाडीने विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे यांना रंगेहाथ पैसे वाटप करत असताना पकडल्याचे म्हटले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

विनोद तावडे यांनी पाच कोटी वाटल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. तसेच काँग्रेसने यासंदर्भात एक्सवर (X) व्हिडीओ ट्वीट करत विनोद तावडेंसह महायुतीवर जोरदार टीका केली आहे. “देख रहा है विनोद, विनोद यावेळी बघत नाही, पण विनोद पैसे वाटत आहे. भरपूर पैसे वाटत आहे. विनोद पैशांची बॅग घेऊन महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये गेला आणि पैसे वाटायला लागला. पण पकडल्यावर पळायला लागला. पण विनोद किती दिवस असाच पळत राहणार? एक ना एक दिवस पकडला जाईल. आणि रंगेहाथ पकडला गेला पैशांच्या सोबत, अशी जोरदार टीका व्हिडीओच्या माध्यामातून काँग्रेसने केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;