हे पाच कोटी कुणाच्या SAFE मधून निघाले आहेत? राहुल गांधी यांचा थेट नरेंद्र मोदी यांना सवाल

हे पाच कोटी कुणाच्या SAFE मधून निघाले आहेत? राहुल गांधी यांचा थेट नरेंद्र मोदी यांना सवाल

राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणा आणि पैशांचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे.

महाराष्ट्रात भाजपनं पराभव मान्य केला आहे. यामुळं त्यांनी पैसे वाटप करणं सुरु केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी एका मतदारसंघात जाऊन पैसे वाटणं याचं उदाहरण आहे. कितीही पैसे वाटले तरी भाजप महायुती राज्यात विजय मिळवू शकणार नाही. महाराष्ट्राची जनता सत्तापरिवर्तन करणार आहे, असं काँग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी या घटनेवरून थेट नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विनोद तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत राहुल गांधी यांनी विनोद तावडे प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत.नरेंद्र मोदीजी हे पाच कोटी कुणाच्या SAFE मधून निघाले आहेत. जनतेचे पैसे लुटून कुणाला टेम्पो पाठवला होता, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

मतदानापूर्वी पैसे वाटून जनतेचे मतपरिवर्तन करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात त्यांना यश येणार नाही. याप्रकरणी विनोद तावडे यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात याली. त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा. ज्यांनी पैसे वाटले आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाकडून पैसे वाटले जात आहेत. त्याची चौकशी केली जावी, अशी मागणी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;