बाटेंगे और जितेंगे… हा भाजपचा नोट जिहाद, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बाटेंगे और जितेंगे… हा भाजपचा नोट जिहाद, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. जोपर्यंत विनोद तावडेंवर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना सोडणार नसल्याची भूमिका बहुजन विकास आघाडीकडून घेण्यात आली होती. यावर प्रतिक्रीया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘हा भाजपचा नोट जिहाद आहे. सध्या भाजपचे बटेंगे तो कटेंगे नाही तर बाटेंगे तो जितेंगे सुरू आहे’, असा घणाघात केला.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महाराष्ट्राची कुलदैवत तुळजाभवानीचे दर्शन घेतले. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुंबईत परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ”विनोद तावडेंचा व्हिडीओ निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे. आज देखील माझी बॅग तपासली. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”कायदा सर्वांना समान असेल तर निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणाने कारवाई केली पाहिजे. विनोद तावडेंना सरकार पाडण्यात पीचएडी मिळायला हवी. काही ठिकाणी त्यांनी सरकार पाडले. काही ठिकाणी त्यांनी भाजपचे सरकार आणले. त्यामुळे तावडे जर तावडीत सापडले असतील तर त्यांनी सरकारं कशी पाडली त्याचा देखील हा पुरावा आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राने बघितलं पाहिजे यांच्या योजना कशा फसव्या आहेत. एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यांच्याकडे थप्प्याच्या थप्प्या. हा भाजपचा नोट जिहाद आहे. सध्या भाजपचे बटेंगे तो कटेंगे नाही तर बाटेंगे तो जितेंगे सुरू आहे. महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने सर्व बघितलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र निर्णय घेईल. यावर कडक करावई झाली पाहिजे. फक्त गुन्हा दाखल करून पळवले नाही पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;